Friday 18 April 2014

रहा "ग्लोबल"…बना "ग्लोबल"

आज टेक्नोलॉजी च्या काळात वेबसाईट हा लोकांचा मार्केटिंग एजंट बनला आहे. अंड्रोईड मोबाईल स्वस्त उपलब्ध झाल्याने लोकांमध्ये इंटरनेट चा वापर वाढताना दिसत आहे. फेसबुक आणि व्हाट्स हा आता प्रत्येकाच्याच आयुष्याचा भाग बनला आहे. जरी तुम्ही स्वत खूप चांगले इंटरनेट वापरत नसाल तरी आता निघालेल्या सर्वेनुसार जगातील ३९% लोक इंटरनेटचा वापर करताना दिसतात आणि जर तुमच्या व्यवसायाची वेबसाईट नसेल तर तुम्ही खूप साऱ्या सुवर्णसंधीना मुकत आहात. तुमच्या वेब अस्तित्वाला वेळेच आणि स्थानाच काहीच बंधन नसल्याने तुमची वेबसाईट हि तुमच्या स्पर्धाकांविरुद्ध व्यवसायाच्या जाहिरातीसाठी एक हुकुमी पत्ता असू शकेल.

आज माझ्या व्यवसायाला वेबसाइटची काय गरज हेच प्रत्येक व्यावसायिकाकडून ऐकायला मिळत किवा वेबसाईटला खूप दुहेरी महत्व दिल जात. आज भाजीवाल्याला वेबसाइटची तशी गरज नसतेच? मच्छीवाला वेबसाईट घेऊन काय करणार? कपडे तर दुकानात जाऊन घ्यायचीच गोष्ट आहे मग ते तरी कशाला बनवतील वेबसाईट? मिठाई दुकानात गेल्याशिवाय मिळेल का? पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सगळ्यांची वेबसाईट इंटरनेट वर उपलब्ध आहे आणि आणि त्याहूनही आश्चर्य म्हणजे ते यातून खूप चांगल कमावतायत.



वेबसाईट ची गरज का आहे ?

. आता पर्यंतच्या माझ्या सांगण्यात तुम्हाला समजल असेलच कि वेबसाईट हि तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोचवण्याच उत्तम मध्यम आहे. तुमच्या वेबसाईटवरून तुम्ही तुमचे उत्पादन ऑनलाइन विकू शकता आणि तेही जगभरात कुठेही. पण त्यासाठी गरज आहे तुमची वेबसाईट उत्कृष्ट दिसण्याची, तिला नेहमी अप टू डेट ठेवण्याची . जेणेकरून तुमच्या ग्राहकांना तुमच्या उत्पादनाची माहिती व्यवस्थित मिळेल आणि तुम्हाला जास्त काही मेहनत घेता तुमचे उत्पादन विकले जाइल आणि इथे ऑफिस मध्ये बसून तुमच्या बँक अकाऊट ला पैसे येतील

. सकाळचे वाजलेले असतील किवा दिवाळी असेल, इंटरनेट कधीच बंद नसते याचा अर्थ तुमचा बिजनेस वर्षाचे ३६५ दिवस २४ x चालू असतो आणि त्यात तुमच्या मेहनतीची काहीच गरज नसते. समजा तुमच कपड्यांचं दुकान आहे, तर ग्राहकाला नेहमी तुमच्या दुकानाच्या वेळेतच तिकडे याव लागत, पण वेबसाईट मुले रात्री का होईना तो त्याच्या सोयीने खरेदी करू शकतो. त्याबाबत त्यांना कोणतच बंधन राहत नाही.

. जर तुम्ही फक्त मुंबईतच किवा तुमच्या शहरात व्यवसाय करत असाल तर वेबसाईट मुले तुमच उत्पादन कोणतीही मर्यादा ठेवता जगभरात पोहचू शकेल. तिथल्या नव्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. जगभरातून तुमच्या सेवा उत्पादनाची माहिती लोक पाहू शकतील. आज एखादी गोष्ट लोकांसमोर ठेवण्यासाठी तुम्हाला तिथे स्वत जाण भाग असत किवा तुम्ही तुमचा कॅटलॉग पाठवू शकता. पण जेव्हा एखादा ग्राहक बाहेरगावावरून तुम्हाला तुमच्या उत्पादनाची माहिती विचारतो आणि तुम्ही सहजच तुमच्या वेबसाइटची लिंक त्यांना मेल करता तेव्हा काही क्षणात तुमच्या सुंदर आणि महत्वाच्या उत्पादनाची माहिती ग्राहकासमोर काही क्षणातच पोहोचते आणि तुमचा व्यवसाय वाढण्यास मदत होते.

. उत्कृष्ट डिजाईन केलेली वेबसाईट नक्कीच तुमचा व्यावसायिकपणा दाखवते. खर तर तुम्ही तुमचा बिजनेस आहे त्यापेक्षा कसा मोठा दाखवू शकता याच कौशल्य वेबसाईट मध्ये आहे. तुम्ही आणि तुमचे स्पर्धक यातील फरक दाखवण्याचे उत्कृष्ट मध्यम म्हणजे वेबसाईट आहे

. समजा तुम्ही तुमचा बूट विकण्याचा व्यवसाय चालू करत असाल तर ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट बनवण्याचा खर्च हा नक्कीच एखादा दुकान घेऊन व्यवसाय सुरु करण्यापेक्षा कमी असेल. परत तिथे महीन्याच भाड आल, विजेचा खर्च आला, दुकान चालवण्याचा खर्च आला आणि एवढा करूनही ते दुकान फक्त आजूबाजूच्या लोकांनाच माहित असणार पण याव्यतिरिक्त जर वेबसाईट असेल तर हे सगळे खर्च कमी होतात आणि आपले उत्पादन जगात कुठेही पोचण्याला काही सीमा मर्यादा नसतात हा फायदा तर वेगळाच.

. तुमच्या उत्पादनाचा अभिप्राय हि नेहमीच आपल्याला उभारी देणारी गोष्ट असते. मग तो अभिप्राय उत्पादनाच्या बाजूने असेल किवा विरुद्ध. वेबसाईट च्या माध्यमाने तुम्ही अभिप्राय सहज मिळवू शकता. सर्वेक्षण, प्रश्नावली किवा फोरम या मार्फत नवनवीन संशोधन आणि सध्या ग्राहकांना नक्की काय हवाय याची माहिती तुम्हाला वेबसाईट च्या मदतीने मिळू शकेल


तुमच्या वेबसाईट ने नक्की काय करायला हव ?

. तुमची वेबसाईट थोडक्यात बोलकी हवी. अति बडबड करणाऱ्याच ऐकायलाही कंटाळा येतो आणि अति शांत माणूस नक्की काय करतो ते आपल्याला समजत नाही तसच काहीस इथेही लागू होत. तुमच्या वेबसाईट ने तुमचा व्यवसाय थोडक्यात सांगितला पाहिजे पण तेही सोप्या भाषेत. हे काम तुमच्या वेबसाईट ची डिजाईन, वापरलेली चित्र (इमेजेस) आणि मजकूर खूप चांगल्या पद्धतीने करतात. जस जेवणात वापरण्याची एकही गोष्ट मागेपुढे झाली तर जेवणाची चव बिघडते तसच यातलीही प्रत्येक गोष्ट व्यवस्थितच वापरली जायला हवी. जर एखाद्या ग्राहकाला वेबसाईट वर येउन गोष्टी शोधण्यासाठी वेळ लागत असेल तर तो का त्या वेबसाईट वर थांबेल? त्याला अजूनही पर्याय आहेतच कि.

. हे थोड विचित्र वाटेल, पण बर्याच वेबसाईट वर त्यांची स्वताची संपर्क माहिती नसते. जेव्हा मी एक नवीन ग्राहक म्हणून तुमच्या वेबसाईट ला भेट देतो. मला सगळ आवडत आणि आता मला तुमच्याशी बिझनेस करायचा आहे पण तुमचा संपर्क होऊ शकत नाही. किवा तुमच्या वेबसाईट वर दिलेला नंबर चालत नाही. अशा वेळेला माझी गरज जर तातडीची असेल तर मी ताबडतोब दुसरा पर्याय शोधणार. आणि असेच उद्योजक नंतर तक्रार करतात, वेबसाईट आहे रे पण त्यातून नाही येत बिझनेस. कसा येणार? एकतर तुमची वेबसाईट बोलकी नसते आणि असेल तरी अर्धवट. त्यामुळे तुमच्या वेबसाईट वर तुमच्या संपर्काची माहिती नेहमी तुम्ही स्वत चेक करायला हवी. तुमचा ऑफिस उघडत किती वाजता? बंद किती वाजता होत? त्याच्या शाखा कुठे कुठे आहेत? आणि गुगल नकाशाच्या मदतीने तुम्ही तुमचा ठिकाणही व्यवस्थित दाखवू शकता.

. जर तुम्हाला माहितेय, कि तुम्हाला एखाद्या उत्पादना बाबतीत काही प्रश्न नेहमी विचारले जातात तर वेबसाईटमध्ये "Frequently Asked Questions (FAQ)" हा नवीन भाग वाढवून घ्या. याचे दोन महत्वाचे फायदे म्हणजे तुमचा त्याच प्रश्नांची उत्तर देण्यात वेळ खर्च होणार नाही आणि दुसर महत्वाच म्हणजे तुमची ग्राहक सेवा (Customer Service) सुधारण्यात नक्कीच मदत होईल

. व्यवसाय वाढवण्याचा सगळ्यात स्वस्त आणि सोपा मार्ग म्हणजे "ऑनलाइन स्टोर". नवीन ग्राहकापर्यंत पोचणे आणि आपल्या मालाचा खप वाढवणे हाच आताच ट्रेंड आहे. युवा पिढी सध्या ऑनलाइन शॉपिंग ला महत्व देते. नवीन जागी स्वताच दुकान उघडण्यापेक्षा हा मार्ग नक्कीच सोयीस्कर राहील. आणि जर तुमच उत्पादन सात समुद्र पलीकडे पाठवायचं असेल तर कुरिअर कंपन्या आहेतच कि.

. तुमच्या वेबसाइटचा मजकूर नेहमी बदलत राहण खूप गरजेच आहे. त्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या वेबसाईट मध्ये तुमचा स्वताचा ब्लोग सामावून घेणे. काही दिवसात तुमच्या उत्पादनावर किवा बाजारातील घडामोडी वर लेख लिहित जा (तुम्हाला जमत नसेल तर कुणा प्रोफेशनल कडून लिहून घेत चला). यातून तुमच्या ग्राहकांना तुमची वेबसाईट हि नेहमी बदलतेय हे जाणवत राहील (आपल्या व्यवसायाच्या जिवंतपणाच हेच उदाहरण असत) आणि त्यातही गुगल क्रमवारीत तुमची वेबसाईट अग्रेसर राहण्यात मदत होईल.


काही अनुभव

अरे वेबसाईट करायचीये ना, कालच जाहिरात पहिली, ५०० रुपयात पानांची वेबसाईट मिळतेय, करून टाकू लगेच. अरे पण ५०० रुपयात ती व्यक्ती तुम्हाला काय देते याचा कोण विचार करणार? त्या ५०० ला जर तुम्ही नंतर बदलायला गेलात तर तीच किमत कधी ५०००० होईल तुम्हाला कळायचं नाही. खर तर हाच IT क्षेत्राला लागलेला श्राप आहे. सुरुवातीला कमी किमत सांगून ग्राहकाला भुलवल जात आणि नंतर काही काही निमित्ताने छुपे चार्जेस लावून त्यांना लुबाडलं जात. आणि मग हेच ग्राहक हात पोळले कि IT मध्ये खूप फसवणूक होते अस एकमेकांना सांगत हात चोळत बसतात.

कोणत्याही IT कंपनी बरोबर काम करण्याआधी त्या कंपनिची आधीची कामे बघा, त्याचा मार्केट मधला ब्रांड बघा मग भलेही किमत जास्त असेल तरी जेव्हा तुमच काम होईल तेव्हा ते बेस्टच असणार. कारण आज पैसा क्वालिटीलाच दिला जातो.

कित्येक उद्योजकांची वेबसाईट बनलेली असते पण त्याच दर्शन यांनी वर्षानुवर्षे घेतलेलं नसत. काही लोकांना तर त्यांच्या वेबसाईटची लिंक हि माहित नसते अस सांगितल्यावर अतिशयोक्ती होईल पण दुर्दैवाने हे खर आहे. आज टेक्नोलॉजी च्या क्षेत्रात बरीच वर्ष कार्यरत असल्याने बरेचसे अनुभव गाठीस आहेत. त्याचच सार इथे देण्याचा प्रयत्न इथे केला आहे

हा लेख वाचल्यानंतर तुम्ही तुमची वेबसाईट नक्कीच बनवून घ्याल, आधीच बनली असेल तर नेहमी अपडेट करत राहाल किवा दिवसातून एकदा तरी उघडून बघाल अशी अपेक्षा आहे.

--
सुबोध अनंत मेस्त्री 
संचालक - स्वराज्य इन्फोटेक
subodhm@swarajyatech.com
Related Posts Plugin for WordPress, Blogger...