वृत्तसंस्था । नवी दिल्ली
इंटरनेट जगतात नवनवीन प्रयोग करणाऱ्या 'गुगल'ने बुधवारी भारतात 'इनडोअर मॅप्स'ची सुविधा देत असल्याचे जाहीर केले. 'अँड्रॉइड', 'आयओएस' आणि पर्सनल कम्प्युटरद्वारे 'गुगल मॅप'ची सुविधा घेणाऱ्यांना २२ शहरांतील ७५ ठिकाणचे फ्लोअर प्लॅन उपलब्ध होणार आहेत.
या ७५ ठिकाणांमध्ये बरेचसे मॉल, संग्रहालये आणि कन्व्हेंशन हॉलचा समावेश आहे. शिवाय बहुतांश ठिकाणे दिल्ली, मुंबई, पुणे, रायपूर, लुधियाना या शहरांमधील आहेत. 'यापूर्वी केवळ अमेरिकेतच इनडोअर मॅप ही संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यात आली आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक लागला आहे. ही सुविधा देण्यासाठी आम्ही मॉलचे निर्माते आणि संबंधितांशी करार केले आहेत. त्यामाध्यमातून संबंधित जागेचे नकाशे आणि माहिती गोळा करण्यात आली असून, तिचा अंतर्भाव गुगल मॅपमध्ये करण्यात आला आहे,' अशी माहिती 'गुगल मॅप इंडिया'चे संचालक अणि प्रॉडक्ट मॅनेजर सुरेन रुहेला यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात देशातील ७५ ठिकाणांची माहिती संकलित करण्यात आली आहे. जसजसा यूजरचा प्रतिसाद लाभेल, त्याप्रमाणे आणखी काही शहरे आणि ठिकाणे समाविष्ट करण्यात येतील, असेही रुहेला यांनी स्पष्ट केले. अँड्रॉइड, आयफोनद्वारे सध्या 'गुगल मॅप'ची सुविधा वापरणाऱ्या ग्राहकांनाच पहिल्या टप्प्यात 'इनडोअर मॅप'ची सुविधा प्रदान करण्यात येणार आहे. मात्र, त्यांना सध्या अस्तित्वात असणारे 'अॅप' अपडेट करून घ्यावे लागणार आहे. 'अॅप' अपडेट झाल्यानंतर ग्राहकांना नवीन सुविधेचा लाभ घेता येणार आहे. 'मोठ्या मॉलमध्ये फिरताना आपल्याला उपयुक्त असणारे शोरुम अथवा दुकान शोधून काढणे जिकीरीचे ठरते. मात्र, इनडोअर मॅपच्या माध्यमातून स्मार्टफोनद्वारे चुटकीसरशी दुकान शोधून काढता येणे शक्य होणार आहे. मॉलमध्ये प्रवेश करताक्षणीच संबंधित दुकानाचे अस्तित्व शोधून काढणारा नकाशा तुमच्या स्मार्टफोनवर अवतरेल,' असेही रुहेला यांनी स्पष्ट केले. 'अँड्रॉइड, 'आयफोन'मध्ये 'इनडोअर मॅप'चा वापर सुरू केल्यानंतर इमारतीचे फ्लोअर प्लॅन उपलब्ध होतील.
* बहुगुणी 'इनडोअर मॅप'
यूजरला हवे असणारे एखादे विशिष्ट ठिकाण शोधून काढण्यासाठी 'इनडोअर मॅप' विविध पद्धतीने काम करेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे 'वायफाय' शोधण्याची क्षमता होय. कोणत्याही इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर 'जीपीएस' सिग्नलची क्षमता कमी होऊ लागते. त्यामुळे 'इनडोअर मॅप'ची सुविधा अखंड चालू राहावी, यासाठी हे अॅप इमारतीमध्ये प्रवेश करताच 'वायफाय' हॉटस्पॉटचा शोध घेईल. यूजरने स्मार्टफोनमध्ये 'वायफाय स्कॅनिंग' हा पर्याय 'अॅक्टिव्ह' केल्यानंतर 'इनडोअर मॅप'चा प्रभावी वापर करता येणे शक्य होईल, असेही रुहेला यांनी स्पष्ट केले.
* देशभरातील प्रसिद्ध ठिकाणांचाही समावेश
मॉल, कन्व्हेन्शन हॉलखेरीज दिल्लीतील खेलग्राम, वसंत कुंज, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, हैदराबादमधील प्रसिद्ध सालारजंग संग्रहालय, बेंगळुरू, डेहराडून, जयपूर, कोची, कोलकाता, गुडगाव, गोवा, गाझियाबाद, लखनौ, कोईमतूर, भोपाळ या शहरांमध्ये 'इनडोअर मॅप'ची सुविधा देण्यात आली आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/infotech/computer/indoor-maps/articleshow/31530434.cms